नाशिकचे ग्रामदैवत "श्री कालिका देवी" मंदिर ट्रस्टतर्फे आपले स्वागत. नाशिक शहरामध्ये अतिशय पुरातन काळी श्री कालिका मंदिराची स्थापना झाली आणि नवसाला पावणारी व जागृत देवस्थान म्हणुन सर्वत्र ख्याती झाली. अगदी मराठ्याच्या काळापासुन हे मंदिर पुर्वी जंगलात स्थापन झाले आणि मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी सन १७०५ च्या सुमारास केला. पुर्वी जंगलात स्थापन झालेले मंदिर शहराच्या विकासाबरोबर अगदी मध्यवर्ती भागात आले व ते शहरवाशीयांचे प्रमुख श्रद्धास्थान बनले त्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक दर्शनसाठी येऊ लागले.